Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेची सरसकट कर्ज माफीची मागणी (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 11 06 at 5.40.26 PM

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव ग्रामिण या भागात मोठ्या प्रमाणात शेती व शेत पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे जरी होत असले तरी तात्काळ शासनाने सरसकट २५ हजार हेक्टरी मदत शेतकर्‍यांना द्यावी या मागणीसह शेतकर्‍याचे पिकजर्म माफ करावे या मागण्याचे निवेदन अपर जिल्हाधिकारी याच्याकडे शिवसेनेतर्फे करण्यात आली. यावेळी कापलेल्या मक्याला पुन्हा कोम, काळे पडलेले कापसाचे बोड हे घेवून अपर जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली.

शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांना आलेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव ग्रामिण मतदार संघात शेतकर्‍याचे ६८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे लाखो एकर शेती पाण्याखाली गेली असुन शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी यासह ओला दुष्काळ जाहिर करून शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. नुकसानीचे वैयक्तिक स्तरावर पंचनामे न करता सामुहिक पंचनामे करून मदत व्हावी. सरसकट कर्जमाफी करावी. शेतकर्‍याचे पिककर्ज माफ करावे. विज बील माफ करावे या मागण्याचे निवदेनाद्वारे अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाप्रमुख राजेद्र चव्हाण, साहेबराव पाटील याच्यासह शेतकर्‍यांनी केले. शेतातील नुकसान झाले कापसाचे झाड, काळ्या पडलेल्या कापसाचे बोंड, तयार केलेल्या मक्याला फुटलेलो कोम असे नुकसानीचे नमुने घेवून अपर जिल्हाधिकारी याची भेट घेवून त्यांना निवदेन दिले. यावेळी शेतकर्‍यांना तात्काळ २५ हजार रूपयाची मदतीची मागणी करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की, शेतकर्‍याची अवस्था फार बिकट आहे. लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍याची करावे काय हा प्रश्‍न पुढे निर्माण झाला.या वेळी सरकार कोणाचे बनले असे विचारले ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिवसेनेचा बनले बाकी याला वरिष्ठ आहे.असे म्हणून त्यांनी अन्य प्रश्‍नांना बगल दिली.

पहा  फेसबुक लाईव्ह  

Exit mobile version