सावदा शहरातील तो निधी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनीच मिळाला शिवसेनेचा दावा

सावदा, तालुका रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सावदा शहरासाठी विविध विकास कामे व्हावी यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विशेष निधीची मागणी केली होती. सावदा शहरातील निधी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनीच मिळाला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

सावदा शहरात सोमेश्वर नगरमधील नागरिकांच्या विविध विकास कामे होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी या शहरातील या भागातील नागरिकांची एक आढावा बैठक आयोजित केली होती. त्यात लोकप्रतिनिधींनीसह अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत त्यांनी आश्वासन दिले होते. की मी सावदा शहरातील या सोमेश्वर नगर भागासाठी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करून आणिल व त्यांच्या समस्यांचा निपटारा करेल. त्या अनुषंगाने सोमेश्वर नगर परिसरातील रस्ते व डांबरीकरण व खडीकरण याकरता २ कोटी ७० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात १५ लाख चौक सुशोभिकरण असून हा निधी विशेष बाब म्हणून मंजूर केला आहे. आमदार साहेबांनी आढावा बैठकीत आश्वासन दिल्याने प्रयत्न यशस्वी केले आहेत.

“हा विशेष निधी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवड, मुक्ताईनगर, सावदा या पालिकांसाठी १० कोटी रुपये मंजूर करून आणला आहे. या एकत्रित मजूर निधीत सावदा शहरासाठी ०२ कोटी ७० लाख मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती गैरसमजूतीतून काही समोर आणत असून, ही बाब या तशी नसून आमदार पाटील यांनी आढावा बैठकीत दिलेला शब्द  पाळला आहे. शहरातील या नवीन भागातील विकास खुंटला असल्याने त्या विकासाचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता आमदार साहेबांनी केली असून याचे पुरावे माझ्याकडे आहेत. ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ अशी आमची काम करण्याची पद्धत आहे. त्यादृष्टीने आम्ही परिसरातील आणि सावदा शहरासाठी काम करीत असल्याचे शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी यांनी आज सांगितले.

Protected Content