Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कळमसरे येथे श्री दत्त जयंती निमित्ताने शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहचे आयोजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील,कळमसरे येथे सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भगवंत कृपेने व संतांच्या आशीर्वादाने बुधवार  दि. २० डिसेंबर २०२३ पासून ते बुधवार दि. २७ डिसेंबर २०२३ पर्यंत संगीतमय शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात आर्ट ऑफ लिव्हिंग चे आचार्य पंडित योगेश गाडगीळ बंगलोर व रामदेव जी शर्मा यांच्या उपस्थितीत गणेश यागने होणार आहे. संगीतमय शिव महापुराण कथेचे निरूपण प.पू.कृष्णदास महाराज नांदेड (राममंदिर) यांच्या अमृतवाणीतून होणार आहे. दैनदिंन कार्यक्रमात पहाटे काकडा आरती, दुपारी कथा निरूपण, सायंकाळी हरिपाठ,भारुड व रात्री कीर्तन असे कार्यक्रम होतील.

बुधवार (दि.२०) ह.भ.प भगवान महाराज सांगलीकर, गुरुवार (दि.२१) ह.भ.प चेतन महाराज मालेगावकर, शुक्रवार (दि.२२) ह.भ.प अनंत महाराज कजवाडेकर , शनिवार (दि.२३) ह.भ.प परमेश्वर उगले महाराज नांदगावकर, रविवार (दि.२४) ह.भ.प पारस जैन महाराज बनोटीकर, सोमवार (दि.२५) ह.भ.प प्रदीप महाराज भोईसर, ह भ.प मंगेश महाराज दाताळ यांचे मंगळवार (दि.२६) रोजी जागर व बुधवार (दि.२७) रोजी काल्याचे कीर्तन होईल. गणेश याग व महाप्रसादाची सेवा इंजि.नरेंद्र उत्तमराव चौधरी नाशिक यांनी घेतली आहे. तरी पंचक्रोशीतील  समस्थ भाविक भक्तांनी उपस्थित राहून ज्ञानदानाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती ग्रामस्थ कळमसरे यांनी केली आहे.

Exit mobile version