Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वडगाव लांबे येथे युवा नेते मंगेश चव्हाण यांच्याहस्ते शितशवपेटीचे लोकार्पण

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडगाव लांबे गावात सोमवारी युवा नेते मंगेश चव्हाण यांच्याहस्ते शवपेटी लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

तालुक्यातील ५० गावांना शितशवपेटी उपलब्ध होणार
गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात शितशवपेटीची अनुपलब्धता होती. ही समस्या लक्षात घेवून भाजपा व युवा नेते मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्यावतीने तालुक्यातील तब्बल ५० गावांना शितशवपेटी लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने सोमवार 5 ऑगस्ट रोजी वडगाव लांबे गावातून शवपेटी लोकार्पणाचा कार्यक्रम झाला. या उपक्रमाने तालुक्यातील प्रत्येक गावाला त्यांच्या हक्काची शित शवपेटी मिळणार आहे.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी सोमसिंग राजपुत, सरपंच ज्ञानेश्वर जाधव, उप सरपंच अर्चना बोरसे, मा.जी. सरपंच मानसिंग राजपूत, माजी उपसरपंच मनीषा पाटील, रोहिणी चे सरपंच अनिल नागरे, नगरसेवक भास्कर पाटील,नगरसेवक निलेश राजपूत,भाजपा तालुका सरचिटणीस प्रा. सुनील नोकम, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, मा.पं.स. सदस्य सतीष पाटे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, जगदीश चव्हाण आदी उपस्थित होते.

Exit mobile version