Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिरसोलीजवळ तृतीयपंथाचा रेल्वेतून पडून मृत्यू

ttttt

शिरसोली प्रतिनिधी । शिरसोली येथे एका तृतीयपंथांचा मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि.8 जुलै) रोजी सकाळी 8 वाजेपुर्वी उघडकीस आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील खांब क्र.407/22 अप लाईनजवळ एका अनोळखी तृतीयपंथांचा आज (दि.8 जुलै) रोजी सकाळी 8 वाजेपूर्वी रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत शिरसोली रेल्वे स्टेशन मास्टर योगेश खांबे यांनी एमआयडीसी पोलीसात खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शिरसोली स्टेशन मास्टर यांनी एमआयडीसीला खबर दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु आहे.

Exit mobile version