शिरसोली येथील गुरूकृपा हॉस्पीटलचे नवीन वास्तूत स्थलांतर

जळगाव प्रतिनिधी– आरोग्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून याच्या सेवेतून आत्मीक समाधान मिळत असते. कोविडच्या काळाने आरोग्याची महती अजून ठळकपणे अधोरेखीत झाली असतांना वैद्यकीय व्यावसायिकांनी नैतिकतेचे पालन करावे. शासकीय आणि खासगी या दोन्ही प्रकारच्या वैद्यकीय सेवा अतिशय महत्वाच्या आहेत. आता कोरोनाच्या काळात या दोन्ही सेवांनी मोलाची भूमिका पार पाडली असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील शिरसोली येथील डॉ. सोपान अर्जुन पाटील यांच्या गुरूकृपा हॉस्पीटलच्या नूतन वास्तूच्या उदघाटनाच्या प्रसंगी बोलत होते.

तालुक्यातील शिरसोली येथील डॉ. सोपान अर्जुन पाटील यांच्या गुरूसेवा हॉस्पीटलचे नवीन वास्तूमध्ये स्थलांतर झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेष पाटील ,माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, पंचायत समिती सभापती ललीता पाटील, डॉ. किशोर झंवर, डॉ. रूपेश पाटील, माजी सभापती नंदु पाटील, पंचायत समिती सदस्य निर्मलाबाई कोळी, शिवराज पाटील , शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, पंचायत समिती सभापती ललीता पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, डॉ. किशोर झंवर, डॉ. रूपेश पाटील, माजी सभापती नंदु पाटील, पंचायत समिती सदस्य निर्मलाबाई कोळी, शिरसोली प्र.न. सरपंच प्रदीप पाटील, शिरसोली प्र.बो. सरपंच हिलालआप्पा भील, गोपाळ पाटील, जनाआप्पा कोळी, सुरेश आस्वार, शिवराम पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते फित कापून हॉस्पीटलचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, डॉ. सोपान पाटील हे आधी मुंबई येथे होते. मात्र ग्रामीण भागात वैद्यकी सुविधा प्रदान करण्यासाठी त्यांनी गेल्या १२ वर्षांपासून सेवा प्रदान केली आहे. आज त्यांच्या याच तपश्‍चर्येचे फळ म्हणून गुरूकृपा हॉस्पीटलचे नवीन भव्य वास्तूमध्ये स्थलांतर होत असल्याची बाब निश्‍चीत कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जोशी यांनी केले. तर प्रास्ताविक आणि आभार डॉ. अर्जुन पाटील यांनी मानले. याप्रसंगी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content