Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिरसाड जि.प. शाळेची भरारी : राष्ट्रीय पोर्टलवर झळकली यशोगाथा !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची यशोगाथा राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था अर्थात एनआयईपीएच्या राष्ट्रीय पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शिरसाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने मोठी कामगिरी बजावली आहे. याबाबतची माहिती एनआयईपीएच्या लिंकवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनकामी आयोजित केलेल्या पालक सभेत आणि केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये  तत्कालीन मुख्याध्यापिका सौ संगिता धनंजय पाटील आणि शिक्षक वृंद यांचा जाहीर सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यापूर्वी देखील संपुर्ण जगावर आलेल्या कोविड संकटाच्या काळामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या मार्फत प्रसिध्द झालेल्या जिल्ह्यातील ’उपक्रमशील शाळा’ या पुस्तिकेमध्ये शाळेची यशोगाथा प्रसिध्द झाली होती.

मागील मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन  संस्था, औरंगाबाद अर्थात एमआयईपीएA मार्फत राज्यातील शाळांच्या यशोगाथा मागविण्यात आल्या होत्या. राज्यभरातील मुख्याध्यापक ते राज्यस्तर अधिकार्‍यांचे सक्षमीकरण करणे, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, नवी दिल्ली (निपा) यांनी निर्देशित केल्याप्रमाणे शालेय नेतृत्व विकास संदर्भातील कार्यक्रम कार्यान्वित करणे, ही  शैक्षणिक नियोजन व्यवस्थापन व प्रशासन संस्था औरंगाबाद या संस्थेची उद्दिष्टे आहेत.

वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार शिरसाड शाळेची यशोगाथा महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन  संस्था, औरंगाबाद यांच्याकडे पाठविण्यात आली होती. संपूर्ण यशोगाथा शब्दांत मांडून संकलित करण्याचे काम शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक वसंतराव चव्हाण यांनी केले होते. सदर यशोगाथा राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था एनआयईपीए मार्फत राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शिरसाड शाळेसाठी नक्कीच ही कौतुकास्पद बाब ठरली आहे. मागील वर्षीही शाळेस जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळाला होता. शाळेने मागील पाच वर्षांमध्ये आठ लाखापर्यंत लोकसहभाग मिळवून केलेल्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा तथा राबवलेले विविध उपक्रम, तंत्रज्ञानाचा शालेय प्रशासनामध्ये तथा अध्ययन-अध्यापनामध्ये केलेला प्रभावी वापर, शाळेची नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी सविस्तर माहिती सदर यशोगाथेमध्ये देण्यात आली आहे.

याचे श्रेय शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक रविंद्र शामराव पाटील यांनी शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका संगिता धनंजय पाटील, शाळेतील शिक्षक वृंद  तथा शाळा व्यवस्थापन समिती यांना देऊन सर्वांचे अभिनंदन केले. यापुढेही सर्वांच्या सहकार्याने शाळेमध्ये  सकारात्मक बदल व्हावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त केले.

त्याचबरोबर साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी,  यावलचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके साहेब यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे. संगिता धनंजय पाटील यांनी शाळेचे कर्तुत्ववान माजी विद्यार्थी,  केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, डाएट चे सन्माननीय अधिकारी तथा चएखझA आणि छखएझA यांच्यासोबत शाळेत त्यावेळी कार्यरत असलेले उपशिक्षक राजाराम मोरे, राजेंद्र अटवाल, दीपक चव्हाण, शेख महबूब, किशोर पाटील, अविनाश पाटील, अर्चना शिंदे या सर्व शिक्षकांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version