Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे मुस्लीम कार्यकर्त्यांनी केला शिरीष चौधरी यांचा सत्कार

yaval satkar

यावल, प्रतिनिधी | येथील संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेले जशने पैरहन शरीफच्या भव्य अशा मिरवणुकीत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपली भेट देवुन पैरहन शरीफमधील सय्यद गौसुल आजमपिराने पिरदस्तगीरदांच्या पवित्र वस्त्र असलेल्या ढोलीचे दर्शन घेवुन आशिर्वाद घेतले. यावेळी बाबुजीपुरा येथील युवा पंचकमेटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मन्सुरी पिंजारी बिरादरीचे तालुका अध्यक्ष एजाज़ कादर पिंजारी यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.

 

यावेळी जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, पंचायत समितीचे गटनेता शेखर सोपान पाटील, गुलाम रसुल मेम्बर, नगरसेवक शेख अस्लम शेख नबी, नगरसेवक मनोहर सोनवणे, समीर शेख, समीर मोमीन, कॉंग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष कदिर खान, युवक काँग्रेस अध्यक्ष अलीम शेख, अल्पसंख्यांक आघाडीचे शहर अध्यक्ष रहेमान खाटिक, अल्पसंख्यांक आधाडी शहर उपाध्यक्ष राजु पिंजारी, नहीम शेख, इमरान पहेलवान, अनिल जंजाळे, अय्युब खान सय्यद, अश्पाक नदीम शेख, आदी प्रमुख कार्यकर्ते व मुस्लीम समाज तरुण मंडळी व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माजी आमदार शिरीष चौधरी, प्रभाकरसोनवणे, शेखर सोपान पाटील यांच्यासह कार्यर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीत ठेका धरला होता.

 

 

 

Exit mobile version