Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार-विजय वडेट्टीवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यादरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे.

आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल लागल्यानंतर जर शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले तर भाजपने प्लॅन बी तयार केला आहे असे बोलले जात आहे. यादरम्यान शिवसेनेचा शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल असे वडेट्टीवार म्हणाले आहेत. हे १०० टक्के खरं आहे असंच होणार आहे. भाजपची चाल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कळेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

 

Exit mobile version