Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंदे गटाचा काँग्रेसला विदर्भात धक्का; आमदार शिवसेनेत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेते पक्षाला रामराम करत भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादीत जात आहेत. आता विदर्भातील उमरेड मतदारसंघाचे आमदार राजू पारवे यांना आपल्या आमदारकी आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार कृपाल तुमाने आणि आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून ते धनुष्यबाण चिन्हांवर रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा आता रंगली आहे. महायुतीतमध्ये रामटेक मतदारसंघ शिवसेनेला मिळणार आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी राजू पारवेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

 

Exit mobile version