Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंदाड ग्रामपंचायततर्फे शिक्षकांचा सन्मान व विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदाड ग्रामपंचायततर्फे आजी – माजी शिक्षकांचा सन्मान व यशस्वी विध्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात येते. त्याचे औचित्य साधून मातोश्री हॉल येथे ग्राम पंचायतीने आजी – माजी शिक्षकांचा सन्मान व विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावातील जेष्ठ नागरिक व सेवानिवृत्त शिक्षक प्रल्हाद वना पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प‌. सदस्य मधुकर काटे होते. सुरवातीला मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या नंतर सुमारे १०० आजी, माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ, व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच इयत्ता – १० वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनी अश्विनी विनायक पाटील, द्वितीय, विशाल भगवान मोरे, वैष्णवी इंदल परदेशी, व मयुरी रवींद्र चौधरी तर तृतीय मनीष सुनील पाटील यांचा गौरव करण्यात आला शिंदाड शाळेतील समाज विकास विद्यालयाचे आजी माजी शिक्षक, जि. प. शाळेचे शिक्षक तसेच गावातील रहिवाशी व बाहेरगावी शाळेला शिक्षक असलेले आशा १०० शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मधुकर काटे, सेवानिवृत्त शिक्षक उत्तम तांबे, प्रल्हाद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास आदर्श शिक्षक सुभाष देसले, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष हिलाल पाटील, माजी सरपंच कैलास पाटील, शाळेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी मुख्याध्यापक आर. के. चौधरी, एस. डी. पाटील, मुख्याध्यापक ए. पी. गव्हाळे, मीना नेहरकर, प्रशांत पाटील, तसेच  ग्राम पंचायत सदस्य संदीप सराफ, विलास पाटील, स्वप्नील पाटील, अकिल तडवी, उज्वला पाटील, मीराबाई परदेशी, कांताबाई पाटील, जनाबाई पाटील, ठगुबाई धनगर, नजमबाई तडवी, लालबी तडवी कांचन परदेशी तसेच गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. पी. पाटील, नामदेवराव पाटील यांनी केले. प्रास्ताविक नरेंद्र पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार संदीप सराफ यांनी मानले.

 

Exit mobile version