Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर येथे होळी पूजनाने शिमगा उत्सवाची सुरूवात

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा करण्यास सुरवात झाली आहे. आदिवासी ठाकूरांच्या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे ठाकूर जमातीतील महिला मंडळ पुढाकार घेऊन होळीची तयारी करतात. श्रीराम कॉलनी येथील संत सखाराम महाराजांच्या शेतात पारंपारिक पद्धतीने ठाकूर समाजातर्फे होळी साजरी केली जाते. उंबर झाडाची फांदी उभी करून खोल खड्यातील पायाशी गवरी ठेवून सामूहिक वर्गणीतून गोळा केलेली कोरडी लाकडं, गवऱ्या रचून होळी उभी करण्यात आली होती. होळीस सजावट साहित्य , होळीला रंगबिरंगी पताका, फुगे लावून महिलांनी होळी सजविली होती.

महिला प्रमुख मिनाताई ठाकूर, सचिव शैलजा शिंदे, कोषाध्यक्ष अपेक्षा पवार, उपाध्यक्ष रेखा ठाकूर, सल्लागार जयश्री वाघ,हिराबाई ठाकूर, हर्षदा वाघ,आशा ठाकूर,भारती ठाकूर,संगीता ठाकूर, स्वाती ठाकूर, प्रियंका ठाकूर, हर्षदा ठाकूर , मनीषा ठाकूर,मंगल ठाकूर, यमुनाबाई ठाकूर, संगीता ठाकूर, रुपाली ठाकूर, दिपाली ठाकूर, कोकीलाबाई ठाकूर,गायत्री ठाकूर,सरलाबाई ठाकूर यांचेसह उपस्थित महिलांनी होळीची विधिवत पूजा करून खना,नारळाची ओटी वाहून होळीला अग्नी दिला. तर याप्रसंगी जमातीचे प्रमुख दिलीप ठाकूर, राज्याचे सरचिटणीस कार्यकर्ते रणजित शिंदे, गुणवंत वाघ, जितेंद्र ठाकूर, संजय ठाकूर, डॉ. कौस्तुभ वानखेडे ,अनिल ठाकूर, मच्छिंद्र बागुल, धनराज ठाकूर, रविंद्र वानखेडे, प्रकाश वानखेडे, आदिंनी होळीला पुष्पहार हारडा हार, कंगन अर्पण करून पूजन केले. होळी रे होळीच्या गजरात होळीला नवैद्य अर्पण करीत पूजन केले. यावेळी विजय ठाकूर, गजानन ठाकूर, उमाकांत ठाकूर, राजेंद्र ठाकूर, ज्ञानेश्वर ठाकूर, सुरेश ठाकूर, सतिश ठाकूर जेष्ठ कार्यकर्ते लिलाधर ठाकूर, रामदास ठाकूर, भैय्या ठाकूर, यशवंत सूर्यवंशी, युवा कार्यकर्ते दिपक ठाकूर, वैभव ठाकूर, दिपक वानखेडे, विवेक सूर्यवंशी, गणेश ठाकूर, मुकेश ठाकुर आदिंसह समाज बांधव व भगिनींनी होळीच्या अग्नीभोवती उत्साही वातावरणात फेर धरला.

आदिवासी ठाकुरांमध्ये पाच दिवसीय होळीचा शिमगा उत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न ठाकूरांच्या सामूहिक होळीतून अमळनेरात होत असतो. होळीचा प्रसाद म्हणून उपस्थिताना गुळाची जिलेबी यावेळी वाटप करण्यात आली.

Exit mobile version