Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकऱ्यांनी टोळधाड कीडीचा प्रतिबंध करण्याचे कृषी विभागातर्फे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी । वाळवंटी टोळ ही कीड आंतरराष्ट्रीय व जागतीक महत्वाची कीड आहे. नाकतोड्याच्या गटातील ही टोळ आपल्याकडे आढळते. वाळवंटी टोळ जी तांबुस रंगाची असते. ती अत्यंत खादाड व नुकसान करणारी आहेत. त्यामुळे या किडीचा प्रतिबंध शेतकऱ्यांनी सामुहिकपणे करणे आवश्यक आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कळविले आहे.

टोळधाडीचे नियंत्रण व उपाय करण्यासाठी त्यांच्या अंडी घातलेल्याजागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास त्यांच्या पिलांना अटकाव करणे शक्य होवून नियंत्रणात ठेवता येते. नीम तेल प्रति हेक्टरी 2.5 लिटर फवारणी करावी, मिथील पॅराथीआन 2 टक्के भूकटी 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी, बेंडीओकार्ब 80 डब्ल्युपी, क्लोरोपायरीयाफॉस 20 ईसी, 50 ईसी, डेल्टामेथ्रीन 2.8 युएलव्ही, डायफ्लुबेंझुरॉन 25 ईसी, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 5 ई.सी व 10 डब्लूपी, मॅलाथिऑन 50 ईसी, 25 ईसी व 95 युएलव्ही या किटकनाशकांची टोळ नियंत्रणासाठी शिफारस अलिकडेच केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोदणी समितीने केलेली आहे. अधिक माहिती तथा मार्गदर्शनासाठी तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या कृषीधनाचे नुकसान टाळावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version