Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतीच्या वादातून लहान भावाचा खून; बेटावद येथील घटना

jamner news

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील बेटावद खुर्द येथील दोन भावाच्या वादाचे रूपांतर हत्येत होवून मोठ्या भावाच्या हातून लहान भावाची शेतीच्या वादातून हत्या घडल्याची घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. मयताचा मोठा भाऊ संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर असे की, बेटावद खुर्द येथील रणजित प्रताप राजपूत व धनराज प्रताप राजपूत हे दोघ भाऊ आपल्या कुटुंबासह गावात राहून मालकीची तीन एकर कोरडवाहू शेती करतात. दरम्यान सोमवारपासून मयत धनराज (वय-३८) हा बेपत्ता होता. त्यानंतर आज बुधवारी त्याचा मृतदेह बेटावद बुद्रुक शिवारातील राजेंद्र पाटील यांच्या शेतातील विहीरीत तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करत घटने विषयी माहिती घेत तपास करून मयताचा मोठा भाऊ रणजीत यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. मयताची पत्नी मनीषा राजपूत यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये संशयित रणजित राजपूत विरोधात कलम ३०२, २०१, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. दरम्यान घटनास्थळ ठसे व श्वान पथक पोहचले आहे. या घटनेची कसून चौकशी होत आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, सपोनि राजेश काळे, रमेश कुमावत, जयसिंग राठोड, सचिन पाटील यांनी भेट दिली. घटनेचा पुढील तपास सपोनि राजेश काळे करत आहे. या दोन भावामध्ये शेतीचा एवढा विकोपाला जावून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या करून. त्याचे हातपाय दोरीने बांधून विहीरीत टाकून दिले.याविषयीची चर्चा बेटावद गावासह परिसरात ऐकण्यास मिळत होती. मयत धनराजच्या पश्चात आई पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Exit mobile version