समस्या सोडवा, अन्यथा आत्महत्येशिवाय मार्ग नाही ! : शेतकर्‍याचे निवेदन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | साखर कारखान्याकडुन ऊसतोड होत नसल्यामुळे उस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या कर्जबाजारीमुळे शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर असल्याची व्यथा शेतकरी विजय पाटील यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. ही समस्या न सुटल्यास आपल्याला आत्महत्या करावी लागेल असा इशारा देखील या शेतकर्‍याने दिला आहे.

यावल तालुक्यातील सावखेडासिम येथील राहणारे शेतकरी विजय प्रेमचंद पाटील यांनी तहसीलदार महेश पवार यांना दिनांक ४ मे रोजी दिलेल्या तक्रार निवेदना म्हटले आहे की , माझ्या बोराळे तालुका यावल या शिवारातील गट नं .७ / अ च्या चार एकर क्षेत्रामध्ये फेब्रुवारी २०२१या वर्षात मुक्ताई साखर कारखान्याच्या सांगण्यावरून उस लागवड केली होती, या लागवडीची नोंद कारखान्याचे शेती कर्मचारी बंडु पाटील यांनी केलेली आहे . साधारण मार्च महीन्यात या उसाची तोड झाली पाहीजे होती आता चार महिने झाली तरी उसतोड होत नसल्याचे पाहुन विजय पाटील हे हवालदिल झाले, पाटील यांनी नंतर मुक्ताईनगर कारखान्याचे कर्मचारी मयुर पाटील यांच्याशी संपर्क साधुन आपल्या शेतातील उसतोड करण्यासंदर्भात विचारणा केली असता मयुर पाटील यांनी सांगितले की आमच्याकडे उसतोड करणारी टोळी नसल्याने तुमचा उस तुटणार नाही असे सांगीतले , कारखान्याच्या बेजबाब्दार वागणुकीमुळे माझे जवळपास तिन लाख रुपयांचे नुकसान होणार आहे.

सदर उस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील उसतोड झाली नाही तर शेतकरी कर्जबाजारी सह विविध संकटात ओढवले जातात असे विजय पाटील यांनी म्हटले असुन उसतोड झाली नाही तर अखेर मला ही उस पेटवुन द्यावा लागेल व त्यामुळे अशा अवस्थेत मुक्ताई साखर कारखान्याच्या वतीने तात्काळ दखल न घेतल्यास मला आत्महत्या करावी लागेल असा ईशारा ही संकटात सापडलेले उस उत्पादक शेतकरी विजय प्रेमचंद याटील यांनी दिला आहे .

Protected Content