Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णीचा व्यावसायिक गोळीबारात जखमी

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी | येथील खाटीक व्यवसाय करणारा एक जण मालेगाव जवळ करण्यात आलेल्या गोळीबारात जखमी झाला आहे.

शेंदुर्णी येथील चौघे खाटीक व्यावसायिक बकर्‍या विक्रीसाठी पिकअप वाहनाने मुंबईकडे जात होते. त्यांचे वाहन मालेगाव शहराजवळ येताच दुचाकीवरून तिघांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून वाहन थांबवण्यास सांगितले. मात्र, त्यांनी वाहन न थांबवल्याने संशयितांपैकी एकाने वाहनावर गोळीबार केला. गोळी क्लीनरच्या बाजूस बसलेल्या जावेद खाटीक यांच्या डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी जावेद खाटीक यांना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

Exit mobile version