शेंदुर्णी नगरपंचायतीला माझी वसुंधरा पुरस्कारात राज्यात दुसरा क्रमांक

शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माझी वसुंधरा पुरस्कारात नगरपंचायत गटात 165 नगरपंचायत मधून शेंदुर्णी नगरपंचायतने राज्यात दुसऱ्या क्रमांकाला गवसणी घातली आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियान पुरस्कार सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित टाटा थिएटर, मुंबई येथे जाहीर झाला. त्याच सोबत बक्षीस वितरणही करण्यात आले.

यावेळी  शेंदुर्णी हुन मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उपनगराध्यक्ष निलेश थोरात, ज्येष्ठ समाजसेवक अमृत खलसे, नगरसेवक अलीम तडवी, गणेश किसन पाटील, गणेश किसन जोहरे, प्रफुल पाटील, माझी वसुंधरा प्रमुख लोकेश साळी, विजय धुमाळ यांनी पुरस्कार स्वीकारला.

पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी सुत्रसंचालन केले. ग्रामपंचायत, नगरपंचायत, पालिका व महापालिका अशा स्तरावरील निकाल जाहीर झाला. त्यात शेंदुर्णी नगरपंचायतचा राज्यात दुसरा क्रमांक व जळगांव जिल्ह्यातील एकमेव शेंदुर्णी नगरपंचायतला पुरस्कार प्राप्त झाला.सदर पुरस्काराची रक्कम रुपये दोन कोटी आहे.मागील वर्षीही शेंदुर्णी नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्तम कामगिरी केली होती. या वर्षी स्पर्धेचे निकष बदलून झालेल्या स्पर्धेतही शेंदुर्णी नगरपंचायतला राज्यात पहिल्या तीन क्रमांकात आपले नाव कोरण्यात यश आले आहे.

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी शेंदुर्णी नगरपंचायतने केलेल्या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने हा पुरस्कार शेंदुर्णी नगरपंचायतला देण्यात आला.नगरपंचायत गेल्या काही महिन्यांमध्ये स्वच्छता अभियानाच्या बाबतीत घेतलेला पुढाकार व शेंदुर्णी शहरामध्ये केलेले वेगवेगळे बदल यांची दखल घेत या पुरस्कारासाठी शेंदुर्णी नगरपंचायतची निवड करण्यात आली.

नगराध्यक्षा ,मुख्याधिकारी,उपनगराध्यक्ष सर्व सन्माननीय नगरसेवक, व आरोग्य विभाग व इतर सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे.

Protected Content