Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेगावात पुन्हा एकदा खुल्या वातावरणात दुमदुमणार; ‘गण गण गणात बोतेचा गजर’

बुलढाणा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोरोना नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने आज १ एप्रिलपासून निर्बंध मागे घेतले आहेत. मात्र १० एप्रिलपर्यंत ई-पासशिवाय संत श्री गजानन महाराज यांचे दर्शन होणार असून १४ एप्रिलपासून खऱ्या अर्थाने थेट दर्शन घेता येणार आहे.

संस्थानच्यावतीने माहितीपत्रक प्रसारीत करण्यात आले आहे. यात कोरोना नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने आज एप्रिलपासून निर्बंध मागे घेतले आहेत. मात्र शेगांव येथील संत गजानन महाराज संस्थानमध्ये १० एप्रिलपर्यंत ई-पासद्वारेच दर्शन सुविधा सुरु राहणार असल्याच नमूद करण्यात आले आहे.

कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असून बुलडाणा जिल्हा तीन दिवसापूर्वीच कोरोनामुक्त झालेला आहे. राज्यभरातील परिस्थिती सुधारत असल्याने राज्य सरकारने आज १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक नियम हटविले आहेत. ही नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे. परंतु संत श्री गजानन महाराज संस्थानने ई-पास दर्शन बंद केलेले नाही. १० एप्रिलपर्यंत ई-दर्शन पासची नोंदणी झालेली आहे.

त्यामुळे १० एप्रिलपर्यंत ई-पासद्वारेच दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यानंतर ११ ते १३ एप्रिलपर्यंत मंदिरातील अंतर्गत व्यवस्था पुर्ववत करण्यासाठी संत गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी बंद राहील. १४ एप्रिलपासून खऱ्या अर्थाने ई-पास शिवाय दर्शन सुविधा सुरु होईल, असे संस्थानच्यावतीने एका माहिती पत्रकाद्वारे सुचित करण्यात आले आहे.

Exit mobile version