Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुध्दिबळ स्पर्धेत शेगावचा अक्षय शेगोकार विजेता

खामगाव प्रतिनिधी । बुलढाणा जिल्हा चेस सर्कल यांच्यातर्फे खामगाव येथे आयोजित खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत शेगावच्या अक्षय शेगोकार याने स्पर्धेत अपराजित राहात ७ पैकी ६.५ गुणांसह स्पर्धेचे विजेतेपद पटकावले त्यास ५,००० रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले.

तर दुसरे स्थान अकोला येथील श्लोक चंद्रांनी याने ३,००० पारितोषिक प्राप्त केले तर तिसरा क्रमांक खुश दोशी ६ गुण अमरावती याने २००० रुपयांचे रोख पारितोषिक व चषक प्राप्त केला.

स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी सागर फुंडकर हे होते. उद्योजक विजय सेठ राठी मनोज सेठ मोदी ,बुलढाणा चेस सर्कलचे अध्यक्ष सतीशजी राठी, सचिव अंकुश  रक्ताडे,चेस इन स्कूलचे सहसचिव रवींद्र धर्माधिकारी,प्रवीण ठाकरे, वाशिम असोसिएशनचे अध्यक्ष अमित जैस्वालयांच्या हस्ते दीप प्रज्वलन व बुध्दिबळ पटावर चाल करून उद्घाटन करण्यात आले. खामगाव येथील स्पर्धेत एकूण १६१ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यात खामगावसह बुलढाणा अकोला, अमरावती, भुसावळ,जळगाव, जालना,नागपूर, यवतमाळ,चंद्रपूर, वाशिम,पुणे,गडचिरोली, येथील खेळाडू सहभागी झाले होते.

स्पर्धेत एकूण ३० आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धा ही खामगाव येथील मोहन मार्केट येथे संपन्न झाली. संपूर्ण स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना २५ हजार रुपयांची रोख बक्षिसे व चषक तसेच उत्तेजनार्थ म्हणून नऊ,बारा,पंधरा, महिला खेळाडू व ६० वर्षावरील सीनियर खेळाडू बुलढाणा जिल्ह्यातील पहिले तीन खेळाडू यांना चषक व रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली. स्पर्धेतील सर्व  सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले.

स्पर्धेला प्रायोजकत्व बाबुजी गोल्ड ऑइल यांनी  केले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार एडवोकेट आकाशजी फुंडकर, शिंगणे महाविद्यालयाचे अध्यक्ष सदगुंदरावजी देशमुख, तसेच अध्यक्ष सतीशजी राठी, अंकुश रक्ताडे,रवींद्र धर्माधिकारी, गडचिरोली चेस असोसिएशनचे अध्यक्ष सतीश त्रिनगरिवार, पंच प्रवीण ठाकरे हे उपस्थित होते. स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सपना लड्डा यांनी केले तर आभार सहसचिव ऋषिकेश लोखंडकर यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

खुल्या गटातील विजेते खेळाडू

१)अक्षय शेगोकार शेगाव, २)श्लोक चंद्रानी अकोला, ३)खुश दोशी अमरावती, ४)पार्थ अशर जळगांव, ५) ललितादित्य नायर पुणे ६)सबीर अदनान बल्लारपूर  ७)अहना पंचगिकर अमरावती ८)चंद्रशेखर देशमुख जळगांव ९)सुश्रुत सुधीर आचार्य अमरावती १०)स्वप्नील कांत अकोला.

वयोगटातील विजेते खेळाडू

७ वर्ष वयोगट

१)ईशान लड्डा अमरावती २)अभिराज कुंफेअर जालना ३)गौरव बोरसे जळगांव ४)अद्विक सदावर्ते खामगाव

९ वर्ष वयोगट

१)परिधी गांधी खामगाव २)प्रसन्ना हिरपूरकर अमरावती ३)देवानंद राजगुरू देऊळगाव माळी

१२वर्ष वयोगट

१)चिराग बैस अमरावती २) दिव्यांश अग्रवाल अकोट ३)कबीर तायडे अकोला

१५ वर्ष वयोगट

१) देवांशी गावंडे अकोला २) शिवकुमार खावने खामगाव ३) सुमित अग्रवाल अमरावती

महिला खेळाडू

१) आर्या गावंडे अकोट २) सानिका तेलंग अकोला ३) निशिका लड्डा खामगाव

बुलढाणा खेळाडू

१)डॉ.विशाल बंड नांदुरा २) विनायक बाली मेहकर ३) ओम पाटील मलकापूर

सिनियर खेळाडू

१)  पद्माकर करनकर भुसावळ २) ईश्वर रामटेके नागपुर  ३) कुलभूषण बांडे दिग्रस

तसेच स्पर्धेतील सर्वात लहान ५ वर्षाचा खेळाडू चंद्रपूर येथील दर्शीत अंकित जैन व उंद्री येथील ८० वर्षीय ज्ञानदेव बापूजी जुमडे व नागपूर येथील ७४ वर्षीय ईश्वर रामटेके यांचा शाल श्रीफळ व चषक देऊन विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे राहुल सावळे, वाशिम निनाद सराफ अमरावती,निनाद वारूडकर खामगाव यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी सतीशजी राठी अंकुश रक्ताळे, ऋषिकेश लोखंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अलीअसगर बोहरा, कुणाल सोनले, श्वेता रेड्डी, समर्थ बाळापुरे, श्रुती अटोळे,तेजस शिरसाठ, अगस्ती दुतोंडे,चेतन केदार,गायत्री इंगळे, सार्थक देशमुख यांनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version