Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महेलखेडी सरपंचपदी शरीफा तडवी तर उपसरपंचपदी माया महाजन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील महेलखेडी ग्रामपंचायतवर राज्यातील महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असुन यात सरपंचपदी काँग्रेसच्या शरिफा तडवी तर उपसरपंचपदी शिवसेनेच्या माया महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

महेलखेडी ग्रामपंचायत कार्यालयात या विभागाचे कृषी अधिकारी व निवडणुक निर्णय अधिकारी शिवनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच व उपसरपंच निवडीची विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी काँग्रेस सेवा फौंउडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांच्यासह कोरपावली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचीत उपसरपंच प्रतिनिधी मुक्तार पटेल, राष्ट्रीय काँग्रेस कमेटीचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, पराग महाजन, सुदाम पाटील, दिनूअप्पा, मुज्जफर पटेल, जावेद पटेल आणि पराग महाजन मित्र परिवार महेलखेडी कोरपावलीचे ग्रामस्थ मंडळी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थितीत होती.

 

Exit mobile version