शारदोपासक महिला मंडळाचा शारदीय नवरात्र सोहळा हर्षोल्हासात

एरंडोल प्रतिनिधी । येथील शारदोपासक महिला मंडळाचा तीन दिवसीय शारदीय नवरात्र सोहळा आनंदात संपन्न झाला.

या कार्यक्रमात तीन दिवस देवीची स्थापना, पूजा, आरती,भजन याशिवाय विविध स्पर्धांचे व विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. निता तिवारी, अर्चना तिवारी, दर्शना तिवारी, मनीषा पाठक यांनी सुंदर भजन संध्या आयोजित केली. तर डॉक्टर राखी काबरा यांनी महिलांना करोना संबंधित सूचना करत महिलांशी संवाद साधला व महिलांना लस घेण्यास प्रोत्साहित केले.

कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात कॅरम स्पर्धेत सोनाली तिवारी यांचा प्रथम तर शकुंतला अहिरराव यांचा द्वितीय क्रमांक आला चित्रकला स्पर्धेत निकिता लढे हिचा प्रथम तर सोनाली तिवारी यांचा द्वितीय क्रमांक आला तसेच या स्पर्धांमध्ये मधुरा पाटील, नंदिनी ठक्कर, मनिषा पवार, रेखा ठाकूर, अशा सावंत, माधुरी महाले, पायल ठाकूर, यांनी देखील सहभाग घेतला. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी एरंडोल शहराच्या माननीय तहसीलदार सौ सुचिता चव्हाण कार्यक्रमास उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

शारदोपासक महिला मंडळातर्फे तहसीलदार मॅडमचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी महिलांशी संवाद साधला. कार्यक्रमास मंडळाच्या अध्यक्षा रश्मी दंडवते, अंजली बिडवईकर, आशा निगुडकर, पाटील मॅडम, आरती ठाकूर, कुसुम पाटील, नयना महाजन, हर्षदा काळे, प्राजक्ता काळे, कोमल पवार, आकृती पवार, वंदना पाटील, कल्पना भदाणे, हर्षा महाले, रूपाली सोनार, सपना पाटील, शैलजा अग्निहोत्री, वैशाली पल्लीवाळ या महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा साळी यांनी केले तर  आभार शशिकला पांडे यांनी मानले.

 

Protected Content