Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शारदाश्रम विद्यालयाचं “शिवमय” स्नेहसंमेलन उत्साहात!

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । कोल्हे नगर येथील पर्यावरण अभ्यासक्रमावर आधारित समर्पण संस्था संचलित शारदाश्रम विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन “शारदोत्सव” काल मोठ्या उत्साहात पार पडले.

विद्यालयाच्या परंपरेनुसार दरवर्षी विविध संकल्पनेवर शारदोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ‘शिवराज्यभिषेक ३५०वी जयंती‘ या संकल्पनेवर आधारित शारदोत्सव विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी जोगवा,पोवाडा,भारूड, महाराजांची शोर्यगीते,अभंग अश्या विविध नृत्याविष्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा उलगडा केला.

जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील, आमदार राजू मामा भोळे,प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील, कबचौऊमावि राज्यपाल नियुक्त व्यस्थान परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, समर्पण संस्थेचे सचिव संजय भावसार,कोषाध्यक्ष अनिल भोळे आणि ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक अभय उजागरे यांचा हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचा प्राचार्या सौ.चेतना नन्नवरे यांनी वार्षिक आव्हाल सादर केला.

उद्घाटन प्रसंगी उन्मेषदादा बोलत असतांना  पालकांना आश्वासित करत म्हणाले “आपले पाल्य महाराष्ट्रातील आगळ्यावेगळ्या आणि एकमेव पर्यावरण शाळेत शिकत आहेत त्यामुळे त्यांचा अभ्यासा सोबत सर्वांगीण विकास आणि पर्यावरणापप्रती प्रेम नक्कीच जागृत होईल”

वैभवसंपन्न शिवराज्याभिषेक सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता झाली, या प्रसंगी उपस्थितांचे डोळ्याची पारणे फिटली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नृत्यशिक्षक तन्वी शिंपी,प्राजक्ता पाटील व इतर शिक्षक,विद्यालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

Exit mobile version