Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवारांची माढातून माघार हा युतीचा मोठा विजय : मुख्यमंत्री

pawar fadnavis

मुंबई (प्रतिनिधी) शरद पवारांची लोकसभा निवडणुकीतून माघार म्हणजे भाजप-शिवसेना युतीचा पहिला विजय आहे. राजकीय वारं ओळखून पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

देशात आणि महाराष्ट्रात मोदींना पाठिंबा वाढतो आह. मोदीजी एकदा म्हटले होते की बदललेल्या हवेचा अंदाज शरद पवार यांना लवकर येतो त्याचमुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे असेही मुख्यमंत्री म्हटले आहेत. एवढेच नव्हे तर, शरद पवारांना बदललेल्या हवेचा लवकर अंदाज येतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते. त्यानुसारच पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केले. तसेच आपण लोकसभा लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपण आत्तापर्यंत १४ वेळा निवडणूक लढलो आणि जिंकलो आहे. त्यामुळे कोणत्याही भीतीतून ही माघार घेत नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र हा निर्णय त्यांनी जाहीर करताच देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा हा पहिला मोठा विजय झाला आहे असे म्हटले आहे.

Exit mobile version