Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पक्ष आणि चिन्ह गेल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नावं हे अजित पवार गटाला दिलं. दरम्यान, अजित पवार अनेकदा राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला आणि सत्तेत आलो असं सांगतात. मात्र, आज शरद पवारांनी त्यांच्या त्या वक्तव्यावर बोलत अजित पवारांना टोला लगावला आहे.

‘काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असं सांगत आहेत. मात्र, हा दावा अजिबात सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असं म्हणणं चूक आहे, अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. ते रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.  ‘तुम्ही जागृत राहा आणि कष्ट करा. महाराष्ट्र तुमच्यासोबत राहील. जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही,’ असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version