Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशातील सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येईल – शरद पवार

sharad pawar new 696x447

पुणे प्रतिनिधी । सुधारित नागरिकत्व कायद्याला संसदेमध्येही आम्ही विरोध केला होता. आता या कायद्यामुळे देशातील सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले असून ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

CAA आणि NRC बाबत लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. देशात सध्या वेगळेच चित्र दिसतेय. देशासमोरचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. केंद्र सरकारने जो कायदा केला त्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान बांगलादेशातून आलेल्या लोकांसंबंधी हा कायदा आहे. एका विशिष्ट नावाच्या लोकांवर त्यांचं लक्ष केंद्रीत झालेय. सुधारित नागरिकत्व कायद्याला संसदेतही विरोध केला. कायद्यामुळे सामाजिक धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे असंही पवार यांनी म्हटलं आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे म्हणून हा विषय समोर आणला जातो आहे, असाही आरोप शरद पवार यांनी केला.

आपल्या याच पत्रकार परिषदेत त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाचाही उल्लेख केला. याप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केलं. नेपाळमधून अनेक लोक येतात. पुणे शहरातही अनेक ठिकाणी अनेक संस्थांमध्ये नेपाळी काम करतात. दिल्लीत माझ्या सरकारी घरामध्ये दोन नेपाळी लोक माझं घर सांभाळतात. गेल्या ३० वर्षांपासून जास्त काळ ते काम करत आहेत. तसंच माझ्याकडेच नाही तर अनेक संस्थांमध्ये नेपाळी लोक पहारेकरी म्हणून काम करत आहे.

Exit mobile version