Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा बिनविरोध निवड

दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । राष्ट्रवादीच्या कार्यकारणी समितीत एकमताने ठराव मंजूर करत अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली आहे.

दिल्ली येथे ताल कटोरा स्टेडियम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन संपन्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विटद्वारे कार्यकारणी समितीत शरद पवार यांची पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती दिली. 

दिल्लीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या या बैठकीला शरद पवार यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

Exit mobile version