Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवार ॲटीव्ह मोडमध्ये; ३ तीन दिवसांत घेणार ११ शेतकरी मेळावे

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात नुकतेच लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. तर इंडिया आघाडीनेही चांगली कामगिरी केली. आता सगळ्यांना वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे… राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची तयार सुरु केली आहे. नुकतंच शरद पवारांनी दुष्काळी दौरा केला. त्यानंतर आता शरद पवार उद्यापासून पुन्हा बारामती दौऱ्यावर असणार आहेत. शरद पवार उद्यापासून 3 दिवस बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी शरद पवार स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी शरद पवार जाणून घेणार आहेत.

लोकसभेनंतर शरद पवार विधानसभेच्या पेरणी करत आहेत, असं म्हणयला हरकत नाही. कारण दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार तीन दिवस बारामतीत असणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत. 3 दिवसात शरद पवार 11 शेतकरी मेळावे घेणार आहेत. शरद पवार पुन्हा शेतकऱ्याच्या बांधावर जाणार आहेत. याधी शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी गावांचा दौरा केला होता. त्यानंतर उद्यापासून पवार पुन्हा दौऱ्यावर जाणार आहेत.

Exit mobile version