Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जोशी पेठेत तरूणीचा विनयभंग; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । जोशी पेठ परिसरात अश्लिल हावभाव करून २८ वर्षीय तरूणीचा विनयभंग करणाऱ्या तरूणावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील जोशी पेठ येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. २१ मे रोजी रात्री २२.३० वाजता तरूणी आपल्या घरासमोरील ओट्यावर बसलेली असतांना नारायण उर्फ नाऱ्या कोळी रा. बुनकर वाडा, जळगाव हा दुचाकी घेवून तरूणीच्या घरासमोर आला. तरूणीकडून पाहून ‘काव ये गाडीवर बस’ असे म्हणत अश्लिल हातवारे करून तरूणीचा विनयभंग केला. दरम्यान, याचा जाब विचारला असता संशयित आरोपी नारायण कोळी यांने शिवीगाळ करून दुचाकीवरून पळून गेला. याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कवडे करीत आहे.

Exit mobile version