Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महान फिरकीपटू शेन वॉर्नचे निधन

मेलबोर्न-वृत्तसंस्था | ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी फिरकीपटू शेन वॉर्न यांचे वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी निधन झाल्याने क्रिकेट विश्‍वाला धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न यांचे निधन झालं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे शुक्रवारी वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियन मीडियाला दिलेल्या निवेदनात पुष्टी केली आहे की, “शेन थायलंडमधील व्हिलामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर वैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता.”

Exit mobile version