Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाम जाधव यांची दिल्ली येथे भारतीय बौद्ध संघाच्या उत्तर महाराष्ट्र प्रेस मिडिया अध्यक्षपदी निवड

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतनगर येथील रहिवासी बंजारा समाजातील शाम जाधव यांना दिल्ली येथे भारतीय बौद्ध संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भंन्ते संघप्रिय राहुल जी यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्र प्रेस मिडिया अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हि नियुक्ती स्वतः भारतीय बौद्ध संघचे राष्ट्रीय अध्यक्ष संघप्रिय राहुल जी भंन्ते साहेब यांच्या हस्ते दिल्ली येथील भारतीय बौद्ध संघाच्या कार्यालय येथे नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली, राहुल जी भंन्ते हे दिल्ली येथे सर्व धर्मांच्या संताची जयंती, पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम घेत असतात ते सर्व धर्मांचे आदर करतात, त्यांना यावेळी बंजारा समाजाचे थोर संत सेवालाल महाराज यांच्या बदल मला आदर आहे. मी येत्या सेवालाल महाराज जयंतीनिमित्त दिल्लीत भव्य जयंती उत्सव साजरा करणार असे भंन्ते संघप्रिय राहुल जी यांनी सांगितले आहे.

या नियुक्ती प्रसंगी दिल्ली येथे अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय महासचिव दिलीप जी राठोड, अखिल भारतीय बंजारा शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष अरविंद जाधव, राजकुमार चव्हाण राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी बंजारा प्रकोष्ट चे अध्यक्ष, सुनिता मदने सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version