Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या संचालकपदी शैलेश राणे

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा माध्य पतपेढीचे संचालक व जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष यांची जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या संचालकपदी जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष शैलेश राणे यांची वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.

जळगाव येथील आर आर विद्यालयात शुक्रवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटनेची सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न होऊन यात संस्थेच्या संचालक पदाकरिता झालेल्या निवडणुकीत ५९ सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात रावेर तालुक्यातील विवरे येथील शिक्षक संघटना मधील सक्रिय कार्यकर्ते शैलेश राणे यांचे संचालक पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. शैलेश राणे यांच्या निवडीबद्दल माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, नाशिक विभागाचे पदवीधर आमदार डॉ.  सुधीर तांबे ,रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रा प्रकाश मुजुमदार, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष एस डी भिरूड, शिक्षण विकास मंडळ विवरे चेअरमन धनजी लढे, अध्यक्ष मार्तंड भिरूड , बेंडाळे हायस्कूल चे मुख्याध्यापक ए. जी. महाजन आदींनी अभिनंदन केले आहे.

 

 

Exit mobile version