Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लब्बैक फाउंडेशनतर्फे शहीद टीपू सुल्तान जयंती साजरी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण जगात प्रथमच क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणारे व इंग्रजांशी लढतांना आपल्या देशासाठी प्राण देणारे स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपू सुलतान यांची जयंती पाचोरा शहरातील लब्बैक फाउंडेशन तर्फे साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ईकरा एज्युकेशन सोसायटी जळगावचे चेअरमन डॉ. अब्दुल करीम सालार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. जुबेर शेख (धुळे), मुफ्ती हारून नदवी, लेखक व शायर साबीर मुस्तफा आबादी सह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी शहीद टिपु सुलतान यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सांगितले की, अमेरिकेत नासा मध्ये ज्या भारतीय मिसाईल मेन ची चित्र लावलेले आहे तो शेरे मयसूर टिपू सुलतान आहे. ही गोष्ट प्रत्येक भारतीयांसाठी गौरवची आहे. टिपू सुलतान यांनी शिक्षण, व्यापार, विज्ञान, अनुसंधान, व्यवस्थापन, प्रशिक्षित नौदल, आंतरराष्ट्रीय संबंध, यावर आपले उल्लेखनीय योगदान दिलेले आहे.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणाऱे लब्बैक फाउंडेशनचे सदस्य शाकीर शाह, जुबेर खाटीक, खलील सय्यद, गफार सय्यद, यांचे सामाजिक कार्या बद्दल मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी दहावी व बारावीचे विद्यार्थ्यांचे व शिक्षक शेख जावेद व रेहान खान यांचा सत्कार करण्यात आले. याप्रसंगी मजहर पठाण, निहाल बागवान, हाजी अल्ताफ, जाकीर कुरेशी, रसूल उस्मान, मुस्लिम बागवान, जाकिर अलाउद्दीन, रफिक मेंबर, लतीफ मेंबर, खलील देशमुख, नसीर बागवान, डॉ. इम्रान पिंजारी, संजय चौधरी, तहसील शेख, आदिल शेख हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साबीर मुस्तफा आबादी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार गफफार सय्यद व जुबेर खाटिक यांनी मानले.

Exit mobile version