Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फिरकीपटू शाहबाज नदीमची भारतीय संघात निवड

Spinner Shahbaz Nadeem

रांची वृत्तसंस्था । रांची येथे दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने शुक्रवारी फिरकीपटू शाहबाज नदीम याची भारतीय संघात नुकतीच निवड केली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून रांचीमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. याआधी झालेले दोन्ही कसोटी सामने भारताने जिंकले आहेत. मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऐनवेळी नदीमची निवड करण्यात आली आहे. नदीम अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला नाही. त्याची आता भारतीय संघात अंतिम अकरामध्ये निवड झाली आहे. त्यामुळं त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. ३० वर्षीय फिरकीपटू नदीम आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळलेला आहे. बिहारमध्ये जन्मलेला नदीम झारखंडसाठी खेळतो. त्यानं १११ प्रथम श्रेणीच्या सामन्यांत तब्बल ४२४ विकेट घेतल्या आहेत.

Exit mobile version