शहरातून हद्दपार असलेल्या महिला आरोपीवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून एका वर्षासाठी हद्दपार असलेल्या महिला आरोपीला रामानंदनगर पोलीसांनी जळगावातून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पनाबाई हिरामण जगताप रा. लाकुडपेठ शिवाजी नगर, जळगाव असे या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या हद्दपार आदेश १३ ऑगस्ट २०२१ रोजी अन्वये कल्पनाबाई हिरामण जगताप रा. शिवाजी नगर या महिलेला जळगाव शहरातून १ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. दरम्यान या महिलेने पोलीसांनी कोणतीही परवानगी न घेतला जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आली. रामानंदनगर पोलीसांनी कारवाई करत तिच्याविरोधात हद्दपारीचे उल्लंघन केल्याचे समोर आले. तिच्याविरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ करीत आहे.

Protected Content