Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहर पोलीस ठाण्यात पती-पत्नीचा दांगडो; परस्परविरोधात तक्रार (व्हिडीओ)

Mahila news

जळगाव प्रतिनिधी । न्यायालयीन कामकाजासाठी जळगावात आलेल्या चाळीसगाव येथील विवाहितेचा आपल्या पतीसोबत पोलीस ठाण्यातच दांगडो झाला. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस ठाण्यात आरडाओरड करून एकच गोंधळ घातला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव येथील रश्मी हिचा साडेतीन वर्षापूर्वी शिवाजीनगरातील विशाल उत्तम सोनवणे याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर तीन महिने उलटत नाही तोच पतीसह सासरे, जेठ तुषार सोनवणे यांनी माहेरुन 10 लाख रुपये आणण्याच्या मागण्यासाठी छळ केला. या विरोधात रश्मी यांनी जिल्हापेठ पोलिसात व यानंतर महिला दक्षता समितीकडे तक्रार केली. महिला दक्षता येथे सुनावणीअंती याप्रकरणावर चाळीसगाव येथील न्यायालयात कामकाज सुरु आहे. याउलट पती विशाल सोनवणे यांनी रश्मीसह तिचे वडील, आई यांनी शिवीगाळ तसेच मारहाण केल्याबाबत जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. यावर जिल्हा न्यायालयात कामकाज सुरु आहे.

न्यायालयात शिवीगाळ
पतीने तक्रार दाखल केली असल्याने त्यावर शुक्रवारी कामकामासाठी रश्मी तिचे वडील, आई, बीएसएफ जवान असलेला भाऊ तसेच बहिण हे जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात आले. याठिकाणी पती विशाल तसेच उत्तम दिपचंद सोनवणे यांना शिवीगाळ झाली. याबाबत तक्रार देण्यासाठी विशाल वडीलांसह शहर पोलीस ठाण्यात आला. त्यांची तक्रार घेत असतांना विवाहितेसह तिचे कुटुंबिय शहर पोलीस ठाण्यात धडकले.

याठिकाणी विवाहितेने तिच्या वडीलांना पतीने माझे मागे गुंडे लावले असून त्यापैकी एक मुलगा पोलीस स्टेशनला आले असल्याचे सांगितले. हे एकताच विवाहितेच्या वडीलांना शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षकाच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या तरुणाला चापटांनी मारहाण केली. पोलीस निरिक्षकांसह, गुन्हे पथकातील कर्मचार्‍यांनी तरुणाची सुटका करुन विवाहितेसह तिच्या कुटुंबियाला बाजूला केले. उलट विवाहिता रश्मी हिच्यासह कुटुंबियांनी आम्हाला पोलिसांनी धक्काबुक्की तसेच अरेरावी केली, असा आरोप करत गोंधळ घातला व आरडाओरड करत पोलीस ठाणे आवारात गर्दी जमविली. विवाहिता व तिचे पती दोघांची परस्परविरोधात तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. तसेच गोंधळ घालणार्‍या विवाहितेसह तिच्या कुटुंबियांविरोधात नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version