Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाहरूखच्या मुलाने ड्रग्ज घेतलेच नाही : राष्ट्रवादीचा दावा

मुंबई प्रतिनिधी | शाहरूखचा मुलगा आर्यन खान याला भाजपचा पदाधिकारी असणार्‍या मनीष भानुशाली घेऊन जातांना दिसत असून त्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. बॉलीवुडला बदनाम करण्याचे हे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सध्या गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, एनसीबीने क्रूझवर कारवाई केलीच नाही. मनिष भानुशाली या व्यक्तीने आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांसोबतही फोटो आहेत. यामुळे  भाजपच्या या कार्यकर्त्यांना अशी कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल मलिक यांनी केला आहे. एनसीबीने त्या क्रूझवर छापेमारी केली नाही. शिवाय त्या क्रूझवर ड्रग्ज सापडलंच नाही, असा दवाही त्यांनी केला.

मलिक म्हणाले की, एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे. त्याच्याबरोबर सेल्फी काढणायत आला. सेल्फी व्हायरला झाला. त्यातील व्यक्ती एनसीबीचा अधिकार नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही असं सांगण्यात आलं. मग हा व्यक्ती नक्की कोण? असा सवाल त्यांनी केला आहे.

भाजपने बॉलिवुडला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप देखील मलीक यांनी केला आहे. ड्रग्ज प्रकरणात नेक्स्ट टार्गेट शाहरुख खान असल्याचं एक महिन्यापूर्वीच क्राईम रिपोर्टरांना सांगण्यात आलं होतं. पत्रकारांना ऑफ दी रेकॉर्ड ही माहिती देण्यात आली होती. पत्रकारांनीच आता हे पुढे येऊन सांगितलं पाहिजे. त्यामुळेच हे प्रकरण आम्हाला फर्जीवाडा वाटत आहे, असं मलिक म्हणाले.

Exit mobile version