Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बीडजवळ भीषण अपघात ; सात जणांचा जागीच मृत्यू

Accident

 

बीड(वृत्तसंस्था) पातौस तालुक्यातल्या मांजरसुंबा-पाटोदा या रस्त्यावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दारु सोडविण्याचं उपचार करण्यासाठी बोलेरो गाडीनं हे सर्व जण निवडुंगीला निघाले होते.

दारु सोडविण्याचं उपचार करण्यासाठी बोलेरो गाडीनं हे सर्व जण निवडुंगीला निघाले होते. गाडीत एकूण दहा जण होते. आज सकाळी सकाळी बोलेरो गाडी (एमएच-20 एएच-3470) ने वैद्यकीन्ही येथे उभ्या असलेल्या ट्रकला (एमएच-12 एनटी-7080) धडक दिली. कारचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या अपघातात मृत पावलेल्यांची नावं बन्सी मुंडे, वैजनाथ ज्ञानोबा तांदळे, बाळू पंढरीनाथ मुंडे, अशोक गबरु मुंडे, आसराबाई भीमराव मुंडे अशी आहेत. या मृतांमध्ये एका लहान बाळाचा देखील समावेश आहे. तर इतर अन्य दोन जणांची नावं समजू शकली नाहीत. तर सतीश भीमराव मुंडे यांच्यासह आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Exit mobile version