Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंप्री खुर्द येथून सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथून ७ वर्षीय चिमुकलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे सात वर्षाची मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सात वर्षाच्या चिमुकली खेळत असतांना अपहरण केल्याचे  समोर आले. मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही मिळून आली नाही. अखेर मुलीच्या वडीलांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भालेराव करीत आहे.

Exit mobile version