Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धुळे येथे टेम्पो नदीत कोसळून ७ ठार तर १५ गंभीर

accident5 201905244186

 

धुळे प्रतिनिधी । ऊसतोडीसाठी उस्मानाबाद येथे जात असलेल्या मजुरांनी भरलेला पिकअप टेम्पो पुलावरून नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले असून, अन्य सात किरकोळ जखमी झाले आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावर बोरी नदीच्या पुलावर मध्यरात्री हा भीषण अपघात झाला.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातील मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. अपघातातील मयत हे मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्याचे रहिवासी असल्याचे कळतेय. अरुंद पुलाचा अंदाज चालकाला न आल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. या अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी जखमींना पाण्यातून बाहेर काढत, नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं. जखमींवर उपचार सुरु आहे. अपघाताचे दृश्य इतके भयाण होते की, अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.

Exit mobile version