Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील सात जण हद्दपार

police arrested crime

 

रावेर प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी गुन्हेगारीतील संशयितांवर तडीपारचे आदेश नुकतेच काढले असून तालुक्यातील सात गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुंदन मुरलीधर तायडे (रा.अहिरवाडी ता.रावेर), संदीप गोपाळ गोमटे (रा.अहिरवाडी), प्रदीप मोहन तायडे (रा.अहिरवाडी), गंभीर प्रकाश कोचुरे (रा.अहिरवाडी), विनायक धनसिंग पाटील (रा.नेरुळ ता.रावेर), चंदू दोधु सुरवाडे (रा.निरूळ रा.रावेर), हर्षल अरुण बेलसकर (रा.रावेर) असे आरोपींचे नावे आहेत. यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, Dysp नरेंद्र पिंगळे, SDM अजित थोरबोले फैजपूर, तहसीलदार देवगुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी कारवाई केली आहे. रावेर पो.स्टे हद्दीतील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, सध्या आचार संहिता चालू असून प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे. ज्यांनी दहशत निर्माण करणे, कायदा हातात घेऊन जो अशांतता निर्माण करेल त्यांचेवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पो.नि रामदास वाकोडे यांनी जाहीर केले आहे.

Exit mobile version