दिल्लीत लॉकडाऊन : मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता दिल्ली सरकारने सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन घोषीत केला असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची माहिती दिली.

दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामुळे रूग्णांना अगदी बेड सुध्दा उपलब्ध होण्यात अडचणी येत असून मृतांची संख्यादेखील अचानक वाढली आहे. दिल्ली सरकारने मध्यंतरी जनता कर्फ्यू लाऊन पाहिला असला तरी याचा फारसा उपयोग झाला नाही. या पार्श्‍वभूमिवर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सात दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली आहे.

यानुसार आज म्हणजे १९ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेपासून लॉकडाऊन सुरू होणार असून २६ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत तो सुरू राहणार आहे. यात दिल्लीतील व्यवहार हे पूर्णपणे बंद राहणार असून यात फक्त अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे.

Protected Content