Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सेवाग्राम-साबरमती संदेश यात्रा उद्या मुक्ताईनगरात आगमन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । सेवाग्राम ते साबरमती संदेश यात्रा उद्या मुक्ताईनगरात दाखल होणार असून या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर दुपारी ३ वाजता आगमन होणार आहे. तरी नागरीकांनी उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गांधी स्मारक निधि, गांधी शांति प्रतिष्ठान, सर्व सेवा संघ,सेवा ग्राम आश्रम प्रतिष्ठान,सर्वोदय समाज, राष्ट्रीय गांधी संघ्रालय, नई तालीम समिति, राष्ट्रीय युवा संघठन, प्रदेश  सर्वोदय मंडळे तथा गुजरातच्या सर्वोदय संस्था यात्रेच्या प्रमुख आयोजक आहेत. आज १७ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम आश्रम येथून सेवाग्राम साबरमती संदेश यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. ही यात्रा अमरावती, अकोला, खामगांव, भुसावळ, जळगांव, अमळनेर, धुळे, नदुरबार, बारडोली, सूरत मार्गे अहमदाबाद ला २३ ऑक्टोंबरला पोहोचणार आहे. २४ ऑक्टोंबरला  सावरमती आश्रमात कार्यक्रम होईल. यावेळी या यात्रेत सर्व धर्म प्रार्थना, गोष्ठी, जन संवाद, जनसम्पर्क आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष राही, सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल, मंत्री गौरांग महापात्रा, गाँधी शांति प्रतिष्ठानचे कुमार प्रशांत, राजेंद्र सिंह, एकता परिषदचे राजगोपाल, सर्वोदय प्रवक्ता आशा बोथरा, साम्ययोग संपादक रमेश दाणे, राष्ट्रीय गांधी संग्रहालय, दिल्लीचे संचालक अण्णा मलाई, नई तालिम समिति के डॉ.ठाकुर, यांच्यासह आदी उपस्थित राहणार आहे.

Exit mobile version