Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा पंधरवडा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा जन्म दिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती म्हणजे दि. १७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर हा कालावधी संपूर्ण देशात सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे.

या पंधरवड्याची सुरूवात आज शनिवार, दि. १७ सप्टेंबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चा पाचोराच्या माध्यमातून पाचोरा येथील अटल भाजपा जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करून करण्यात आले होते. याशिबिराला भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी प्रथमतः रक्तदान करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. दि. २५ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी संस्थापक पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्ताने वृक्षारोपण तर त्यानंतर दि. ०२ आक्टोंबरपर्यंत स्वच्छता अभियानाने पंधरवड्याची सांगता करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांच्या जन्मदिवशी पाचोरा तालुक्यातील भाजपा व संलग्न विविध आघाड्यांच्या ७५ पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून रक्त संकलन करण्यात आले. प्रसंगी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, सेवा पंधरवडा तालुका संयोजक सुनिल पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, व्यापारी आघाडीचे कांतीलाल जैन, बाजार समितीचे मा. सभापती सतिष शिंदे, बन्सीलाल पाटील, विधाससभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, ता. सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, दिपक माने, युवा मोर्चाचे गणेश पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, भैया ठाकूर, रवी पाटील, जगदीश पाटील, परेश पाटिल, विरेंद्र चौधरी, लकी पाटील, भरत पाटील, भावेश पटेल, अनिल चांदवाणी, अॅड. राजा वासवाणी, राकेश कोळी, बाळू धुमाळ, गौरव पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रप्रेमी रक्तदाते उपस्थित होते.

तसेच रेडप्लस ब्लड बॅंकचे डॉ. भरत गायकवाड, डॉ. कैलास पेखले, सीमा सावळे, अंतिम मालाकार, पायल कुंभारे, प्रतिक्षा तूल, प्राजक्ता टेंभरे यांनी यावेळी शिबिरात रक्त संकलन केले. तसेच या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवा पंधरवडा समितीचे तालुका संयोजक सुनिल पाटील व भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version