Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव लोक अदालतीत २६ प्रकरणांचा निपटारा

chalisgaon

चाळीसगाव प्रतिनिधी । दिवाणी व फौजदारी न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशानुसार जी.व्ही.गांधे दुसरे सह दिवाणी व फौजदारी न्यायालय क.स्तर यांचे अध्यक्षतेखाली तसेच तालुका विधी सेवा समिती आणि वकिल संघ यांचे संयुक्त विद्यामानाने येथील न्यायालयातील एनआय ॲक्ट138 चे प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडी करीता लोक न्यायालयाचे आयोजन आज करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिवाणी न्यायालय एल.एस.पाढेण व स्तर चाळीसगाव ए.एस.भसारकर, सह-दिवाणी व फौजदारी न्यायधीश क.स्तर चाळीसगाव जी.व्ही.गांधे, २रे सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश क.स्तर, एम.व्ही.भागवत, ३रे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश क.स्तर ॲड. नितीनराव देशमुख, उपाध्यक्ष वकील संघ, ॲड. संतोष पाटील, ॲड.गौतम जाधव, ॲड.संदीप सोनवणे, ॲड.पी.एस.एरंडे यांनी महात्मागांधी व लाल बहादुर शास्त्री यांचे प्रतिमेचे पुजन करुन न्यायालयाला सुरुवात केली होती.

यावेळी लोक न्यायालयात एनआय ॲक्ट138 चे (धनादेश अनादराची) एकुण 148 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २६ प्रकरणांचा समोपचाराने निपटारा करण्यात आला. याशिवाय २० लाख ८९ हजार ४६९ इतक्या रुपयांची वसूली यावेळी लोक अदालतात करण्यात आली.
या लोक न्यायालयात पॅनल ॲड.के.एच.कोर न्यायालयीन कर्मचारी के.जी.सोनार, अधिक्षक योगेश चौधरी, क.लिपीक किशोर पाटील, अमित गेडाम शिपाई यांनी लोकन्यायालयाचे कामकाज पुर्ण केले. यावेळी लोक न्यायालयात पक्षकारांनी मोठया
संख्येत उपस्थिती दिली होती.

Exit mobile version