Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खळबळजनक : बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह जंगलात आढळला !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील गावात राहणाऱ्या बेपत्ता झालेल्या विवाहीत महिलेचे जंगलात मृतावस्थेत आढळून आला आहे. यामुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे.

करसना सुभाष बारेला (वय-३०) रा. गाडऱ्या ता. यावल असे मृत महिलेचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, करसना बारेला ह्या अपपल्या परिवासह वास्तव्याला होत्या. ९ जानेवारी पासून ही महिला राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. याबबात गुरूवारी १२ जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्या या महिलेचा मृतदेह गडऱ्या जंगलात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेप्रकरणी गाडऱ्या गावाचे पोलीस पाटील केरसिंग घाटु बारेला यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे हे तपास करीत आहे. गाडऱ्या येथे घटनास्थळी पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्यासह पोलीस नाईक युनुस तडवी, महीला पोलीस कर्मचारी ज्योती खराटे व गणेश ढाकणे व यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण, कर्मचारी बापु महाजन यांचे पथक रवाना झाले आहे .

Exit mobile version