Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खळबळजनक : भुसावळात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील वांजोळा रोडवर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार सकाळी उघडकीला आला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत वांजोळा रोडवर अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याचे खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ धाव घेतली. यावेळी घटनास्थळी मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घातपातची शक्यता असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत आहे. दरम्यान, मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी निरीक्षक राहुल गायकवाड, पोना. किशोर महाजन, पोहेकॉ विजय नेरकर अशांनी घटनास्थळी भेट देऊन शोध घेण्याचे काम सुरू आहेत.

 

Exit mobile version