जळगावात प्रौढाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका बंद पडलेल्या स्विमींग पुलमध्ये प्रौढ व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

रोहिदास मोतीलाल निकुंभ रा. तांबापूरा जळगाव असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास निकुंभ हे तांबापूर येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. रविवारी १ मे रोजी त्यांना मजूरीचे पैसे मिळाले होते. पैसे घरी दिल्यानंतर ते सायंकाळी ५ वाजता बाहेर गेले. रात्री उशीरापर्यंत घरी न असल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान सोमवार २ मे रोजी सकाळी ११ वाजता जे.के. पार्क येथील बंद पडलेल्या जुन्या स्वीमींग पुलातील पाण्यात त्याचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास  पुढील तपास गणेश शिरसाळे करित आहेत.

Protected Content