Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संभाजीराजेंना राज्यसभेवर बिनविरोध पाठवा -मनसेचा जाहीर पाठिंबा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीराजेना पाठींबा देण्याऐवजी शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला आहे, यावरून संभाजीराजेंना मनसेने जाहीर पाठिंबा दिला असून त्यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्यासाठी सहकार्य करा, असे ट्वीटद्वारे आवाहन मनसेचे आ. राजू पाटील यांनी केले आहे.

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करीत पक्षाचे अधिकृत उमदेवार म्हणून रिंगणात उतरावे, अशी अट ठेवत राज्यसभेच्या दुसऱ्या जागे करिता शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली आहे. अपक्ष म्हणून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी संभाजीराजे यांची भूमिका असल्याने मावळेही महत्त्वाचे असतात असे म्हणत शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.

यावर राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट? छत्रपतींचे नाव घेत छत्रपतींच्या वंशजाच्या पाठीत खंजीर खुपसायचा ही सेना आणि महाविकास आघाडीची निती असून प्रत्येक गोष्टीत महाविकास आघाडी राजकारण करीत असल्याची टीका मनसेने शिवसेनेवर केली आहे.

मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा. राजेंचा मान सन्मान कसा ठेवायचा हे माहित असून सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवा असे आवाहन मनसे आ. राजू पाटील आणि मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्वीटद्वारे केले आहे.

Exit mobile version