Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगाव येथे सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात

भडगाव प्रतिनिधी । येथिल नाभिक समाज मंडळाच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी नाभिक समाज सभागृहाचे भुमीपुजन जिल्हाध्यक्ष रविद्र नेरपगारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाभिक महामंडळ महिला प्रदेशध्यक्षा भारतीताई सोनवणे होते.

श्री. संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळ वतीने संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष संजय पवार (पत्रकार) हस्ते विधीवत पुजन करुन स्थापना करण्यात आली. पुण्यतिथी निमित्ताने लक्ष्मण खैरनार सर यांच्या श्रीराम भजनी मंडळचा कार्यक्रम घेण्यात आला. दुपारी संताची सामुहीक आरती झाली. नंतर माजी उपाध्यक्ष पोपटराव नेरपगारे व शिक्षक विक्रम सोनवणे यांनी सेना महाराज जीवन चरीत्रवर तर योगेश चित्ते यांनी समाज कार्याविषयी माहिती दिली. यानंतर नाभिक समाज सभागृहाचे भुमीपुजन जिल्हाध्यक्ष रविद्र (बंटीभाऊ) नेरपगारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नाभिक महामंडळ महिला प्रदेशध्यक्षा भारतीताई सोनवणे, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर खोंडे, महिला जिल्हाध्यक्ष संगिताताई गवळी, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बहाळकर, जिल्हा सचिव कुमार श्रीरामे, राज्य कार्यकारणी सदस्य सुनिलजी बोरसे, खोडें ज्वेलर्सचे संतोष खोंडे (जळगाव), राजकुमार गवळी, रविद्र शिरसाठ, सेवानिवृत्त पीएसआय संभाजी वेळीसकर, रामभाऊ गागुर्डे ( एरंडोल), कीशोर वाघ, संजय सोनवणे (जळगाव), गणेश सोनवणे, दिपक सोनवणे (चाळीसगाव), नरेश गर्गे, योगेश चित्ते ( पाचोरा) आदि उपस्थित होते.

सभागृह भुमिपुजन नंतर झालेल्या कार्यक्रमात भडगाव येथिल नाभिक समाज कार्याचे कौतुक करत नाभिक समाज सभागृह बांधकामास सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन उपस्थित मान्यवर यांनी दिले. यावेळी समाजाच्या वतीने भारताताई सोनवणे याची भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस पदी निवड झाल्याने तर संजय येवले, मनोहर भोई, नगरपरीषद कर्मचारी छोटु वैद्य, सुनिल पवार, गोविद राजपूत याचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष संजय पवार तर सचिव हिलाल नेरपगार यांनी अभार मानले.

यशस्वीतेसाठी अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगार, खजिनदार विजय ठाकरे, काशिनाथ शिरसाठ, शिवाजी शिरसाठ, प्रभाकर नेरपगार, राजु महाले, सुभाष ठाकरे, निलेश ठाकरे, राजेद्र सोनवणे, गोरख वेळीस, कैलास चव्हाण, सुर्यभान वाघ, बबलु पवार, विजय चव्हाण, भास्कर पवार, सह सर्व समाज बांधव यानी परीश्रम घेतले.

Exit mobile version