साकळी येथे भूमी फाउंडेशनतर्फे सेल्फी पॉईंट

यावल प्रतिनिधी । १२७ भारतीय खेळाडूंनी नुकतेच टोकियो येथील जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आहे. या संदर्भात भूमी फाउंडेशन, साकळीने सेल्फी पॉईंट फॉर चीयर 4 इंडिया मोहिमेअंतर्गत गावातील मुख्य चौकात सेल्फी पॉईंट उभारला आहे.

केंद्र सरकार, केंद्रीय क्रिडा व युवा मंत्रालय, राज्य सरकार सर्वांनीच आपल्या देशाच्या वतीने सहभागी खेडाळूचे मनोबल वाढावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनी जास्तीत जास्त मेडल्स जिंकून आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर उंच करावे , तसेच देशातील युवकांना व सर्व नागरिकांच्या मनांत देशप्रेम व राष्ट्रभावना जागृत व्हावी , म्हणून चीयर 4 इंडिया अभियान राबवीन्याचे आवाहन केले आहे. त्याअंतर्गत सेल्फी पॉईंट उभारणी करून आपण आपला सेल्फी क्लीक करून व #Hamaravictorypunch सारखे व्हिडिओ क्लिप्स Social media (फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटर, इन्स्टाग्राम) वर अपलोड करायचा व Ministry of Youths & Sports , Olympic Association of India, Sports Authority of India ला टॅग करायचे आहे. एकप्रकारे Road to Tokio असे हे अभियान आहे.

त्या अनुषंगाने  भूमी फाउंडेशन ,साकळी ने  साकळी गावातील मुख्य चौकात सेल्फी पॉईंट फॉर चीअर 4 इंडिया उभारला आहे. त्याचे उद्घाटन यावल पोलीस स्टेशन चे माजी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, रवींद्र उर्फ छोटु पाटील, सभापती शिक्षण, क्रीडा व आरोग्य,  तसेच साकळी गावाचे सुपुत्र प्रविण पारीस्कर जे आजच आपली भारतीय फौजेची सेवानिवृत्ती होवून आपल्या गावात परत येत आहेत. तसेच कु. दिशा विजय पाटील,  किनगावकर वय 16 वर्ष, आजपर्यंत 3 वेळेस बॉक्सिंग स्पर्धेत National चॅम्पियन , वयाच्या 18 व्या वर्षनंतर ऑलिम्पिक Qualify साठी प्रयत्नशील तसेच तेजसभाऊ धनंजय पाटील , जळगाव जिल्हा अध्यक्ष ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया , ग्रामपंचायत शिरसाड सदस्य, यावल तालुका संघटक नेहरू युवा केंद्र या पाच  Youth आयकॉन च्या हस्ते आज 1 ऑगस्ट 21, रविवार रोजी दुपारी 3 वाजता साकळी मुख्य चौकात पार पडला.  प्रास्तविक व सूत्र संचलन व आभार प्रदर्शन अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांनी केले.

आपला सेल्फी काढून Social media वर अपलोड करून आपल्या भारतीय खेडाळूना (Athlets) प्रोत्साहन द्यायचे आहे. टोकियो ला गेलेल्या 127 खेडाळूसोबत आपण सर्व 135 करोड भारतीय आहोत हे दाखविण्यासाठी व देशासाठी घाम गाळणाऱ्या देशाचा तिरंगा हातात घेऊन टोकियो ऑलिम्पिक पर्यंत जाणाऱ्या खेडाळूसाठी आपले सर्वांचे दायित्व आहे की एक सेल्फी क्लीक करू या…

चला मित्रांनो… एक सेल्फी.. देशसेवेसाठी ! असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप तायडे, महेंद्र पाटील, अजय पाटील, दीपक खेवलकर,हेमंत वाघळे, मुकेश मराठे,ज्ञानेश्वर सोनार दर्पण खेवलकर यांनी परिश्रम घेतले.

Protected Content